Sat. Jul 6th, 2024

माझे डोळे आले आहेत,Maze dole aale aahet ,My eyes have come, My Eyes are Here अशा भन्नाट शब्दात अनेकजण स्पष्टीकरण द्यायला जातात पण मित्रांनो थांबा. फजिती करून घेऊ नका आपण आज या आजाराविषयी सविस्तर जाणून घेऊयात व डोळे का येतात व त्यावर के उपाय आहेत ते पाहूया.

Dole ka yetat याचा मूळ त्रास होतो तो वेगळाच पण आपला त्रास लोकांना सांगायचा कसा हाच मुख्य प्रश्न अनेकांना पडतो.पावसाळ्यात इतर व्हायरल आजारांसोबतच डोळ्यांच्या साथीमुळे (Pink Eye) चिंता वाढली आहे. सध्या डोळे येण्याचे (Conjunctivitis) झपाट्याने वाढत आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांतून आय फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. डोळ्याच्या साथीच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

डोळे येणे म्हणजे नक्की काय ? -Dole Yene mhanje nakki kay ?

Eye Flu Home Remedy:- डोळे येणे हा संसर्गजन्य रोग आहे,म्हणजेच जर कोणाला अगोदरच डोळे आले असतील आणि आपण त्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला डोळे येण्याची शक्यता असते. डोळे येणे ह्या आजारास english मध्ये Pink Eye किंवा Conjunctivitis असे म्हणतात.आपल्या डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणी खालील भागामध्ये एक पारदरक्षक पडदा असतो त्यालाच आपण conjunctiva असे म्हणतो. डोळे आल्यावर या भागात आग किंवा जळजळ होते व डोळ सुजून गुलाबी होतात , तर काही वेळा सर्दीमुळे किंवा प्रवासात डोळ्यामध्ये काहीतरी कसूभर गेल्यामुळे डोळे चुरचुरतात व अशावेळी डोळे खूप चोळल्यास डोळे येण्याचा त्रास होऊ शकतो.

डोळे का येतात ? त्याची लक्षणे व कारणे आणि घरगुती उपाय-Conjunctivitis Home Remedies

डोळे येण्याची ही आहेत कारणे – Dole Yenyachi hi aahet karne

मुख्यतः डोळे येण्याची दोन करणे आहेत ते आपण पाहूया

  1. इन्फेक्शन मुळे डोळे येणे :- इन्फेक्शन म्हणजे संसर्गामुळे डोळे येणे. डोळ्यात बॅक्टीरिया किंवा व्हायरस यांचे इन्फेक्शन होणे हे डोळे येण्याला कारणीभूत ठरतात. डोळे येणे हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे डोळे येण्याचा साथीचा प्रसार एकमेकाच्या संसर्गाने होतो.
  2. एलर्जीमुळे डोळे येणे :- सर्दीमुळे किंवा केमिकल ,दूषित वायु, दूषित पाणी ,Ultra violet ray, यांचा संपर्क झाल्यामुळे ही डोळे येतात. कॉनटॅक्ट लेन्स चा चुकीचा वापर केला तरी डोळे येतात. सौन्दर्य प्रसाधन मध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकल मुळे ही डोळे येतात.

डोळे येण्याची मुख्य लक्षणे – Dole Yenyachi Lakshane

  • डोळ्यात तोचल्या सारखे होणे
  • डोळ्यात काहीतरी गेल्या सारख वाटण
  • डोळा गुलाबी किंवा लाल होणे
  • डोळ्यात जळजळ होणे
  • डोळ्यातून पाणी येऊन नंतर चिकट घाण येणे
  • झोपेतून उठलयवर डोळे चिकटणे
  • उजेड सहन न होणे, डोळे लगेच झाकणे

डोळे आल्यावर काय करावे ? काही घरगुती उपाय ? काय काळजी घ्यावी ?- Dole aalyavar kay karave, Kahi Gharguti Upay ,Dole alyvar kay kalji ghavi

डोळे येणे या आजारामागे ठोस अस कुठलेही कारण नाही, त्यामुळे ठराविक उपाय करून त्यावर उपचार होईल अस सांगू शकत नाही, पण काही जुन्या रूढी नुसार व आजीच्या बटव्यातील काही घरगुती उपाय वापरुन आपण यावर आराम मिळवू शकतो.

तर चला यावर काय उपाय आहेत ते जाणून घेऊ.

1)डोळे आल्यावर आपण कापूर जाळून धूरी घ्यावी. यामुळे डोळ्यातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.
2 ) एरंडेल तेल काजळासारखे डोळ्याला लावल्याने डोळ्यातील पु बाहेर पडण्यास मदत होते.
3 ) चांदीच्या स्वच्छ दागिन्यांना काहीवेळ पाण्यात ठेवावे व मग ते पाणी डोळ्यात थेंबभर टाकल्याने आराम मिळतो.
4 ) डॉक्टरांकडून डोळे स्वच्छ होण्यासाठी ड्रॉप्स दिले जातात त्यांचा नीट व न चुकता वापर करावा.
5 ) ग्रीन टीच्या वापरलेल्या बॅग थोड्यावेळ फ्रीज मध्ये ठेवून नंतर त्या डोळ्यावर ठेवल्याने थंडावा मिळतो.
6 ) डोळे आल्यावर सूर्यप्रकाशच नव्हे तर घरातील ट्यूबलाईटचा प्रकाशही सहन होत नाही त्यामुळे स्वच्छ गॉगल घालावा.

7)लेन्स वापरत असाल तर लेन्स लावू नये नंतर डॉ. च्या सल्ल्याने वापरावे

डोळे का येतात ? त्याची लक्षणे व कारणे आणि घरगुती उपाय-Conjunctivitis Home Remedies

Conjunctivitis treatments:-

डोळे येणे हा त्रास दोन ते दिन दिवसात कमी होतात. यावरील उपचारासाठी आपले डॉक्टर डोळ्यात घालण्यासाठी Antibiotic Drop देतात व या बरोबर सूज व वेदना कमी करण्यासाठी औषध देतात



By mahabharati.co.in

Latest News,Sarkari Result, Sarkari Job, Vacancy Job Alert, Sarkari Naukri, Sarkari Exam, Free Job Alert, Offline Form, Sarkari Results, etc. Mahabharati website provides updates All Latest Govt Jobs, Results, Answer keys, Admit Cards, Previous Papers, Exam Papers, Online Forms, Offline Forms, Syllabus, Notices, Interview Dates, etc

One thought on “डोळे का येतात ? त्याची लक्षणे व कारणे आणि घरगुती उपाय-Conjunctivitis Home Remedies”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *